Breaking News
Loading...
Saturday, October 11, 2008

दोन घरं मी स्वत:ची
एक ते लाटेत कोलमडलं
आणि दुसरं ते वाहुण गेलं
काय दोष द्यावा त्या लाटेला ?
वाळुवर घर बनवणं
ही गोष्ट्च मुळ चुकीची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

श्रावणात बहर आला
अख्या रानाला पण
एक कळीही ना
उमलली माझ्या अंगणाला
माझ्या अंगणात होते
हिच चुक का त्या रोपांची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

चमकत्या त्या वस्तुला
मी नेहमीच सोनं मानलं
समजाऊनही न बदलली
नितीमत्ता माझी
हाव होती तेव्हा मला
त्या चमकत्या सोन्याची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

आता सगळं संपलय,
उठलाय सगळा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
मजेत आता माळ आसवांची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

पाहतोय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार नाही
कुणाच्याही साथीची
कहाणी ही एका वेडया मनाची ...............

0 comments:

Post a Comment